लातूर बंदला हिंसक वळण

January 6, 2009 4:00 PM0 commentsViews: 3

6 जानेवारी महसूल आयुक्तालय लातूरऐवजी नांदेडला स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. या निर्णयाचे हिंसक पडसाद लातूरमध्ये उमटले. हा निर्णय एकतर्फी घेतल्याचं बोललं जातंय. सर्वपक्षीय आंदोलनात लातूरकरांनी मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरून मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला. सोमवारी रात्रीच लातूर बंदचं आवाहन झालं तसेच बॅनरही लागले होते. मंगळवारी सकाळीच मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाविरोधात मोठ्या संख्येनं आंदोलक रस्त्यावर उतरले. त्यांनी नांदेडकर मुख्यमंत्री अशोक चव्हाणांविरोधात घोषणा दिल्या. दुकानं बंद केली.एसटी फोडल्या. अनके गाड्यांच्या काचाही फोडल्या. दुपारपर्यंत लातूर बंदला हिंसक वळण लागलं. बंद दरम्यान पोलिसांनी 12 आंदोलकांना अटक केली.या आंदोलनाचे परभणीतही पडसाद उमटले. काही ठिकाणी दुकानं बंद ठेवण्यात आली. पण परभणी बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. या हिंसक आंदोलनावरून महसूल आयुक्तालय नांदेडमध्ये स्थापन करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला काँग्रेसमधूनच विरोध होतं आहे असंच दिसतं.मराठवाड्यात 8 जिल्हे तर 19 सबडिव्हिजन आहेत. औरंगाबादपासून इतर जिल्हे कमीत कमी 250 किलोमीटर लांब आहेत. त्यामुळे लातूर किंवा नांदेड इथं आणखी एक विभागीय आयुक्त कार्यालय व्हावं ही लोकांची मागणी होती. शंकरराव चव्हाणांमुळे नांदेडचं नाव पुढे होतं. पण नंतर त्यांच्या मानसपुत्रानं म्हणजे विलासराव देशमुखांनी लातूरचं नाव पुढे केलं. या गदारोळात काहीच निर्णय झाला नाही.मुख्यमंत्रीपदावर साडेसात वर्षांहून अधिक काळ राहिलेल्या विलासराव देशमुख यांनी काही सरकारी कार्यालये लातूरला हलवून विभागीय आयुक्त स्थापन करण्याचा प्रयत्न केला खरा, पण अशोकरावांनी एका घावात दोन तुकडे करीत हा प्रश्न निकाली काढला हे मात्र नक्की.

close