आरक्षणाच्या निर्णयाबाबत पवार आग्रही

January 6, 2009 3:24 PM0 commentsViews: 1

6 जानेवारी दापोलीदापोलीत कोकण कृषी महोत्सवाच्या समारोपाला कृषीमंत्री शरद पवार हजर होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय लवकर द्यावा असं त्यांनी म्हटलं आहे. सरकारने आता मराठा आरक्षणाबाबत महिनाभरात निर्णय घ्यावा अशी जाहीर मागणीही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. मात्र एससी, एसटी या मागसवर्गीयांचं तसंच ओबीसींचं आरक्षण कायम ठेऊन मराठा समाजाला आरक्षण द्यावं असं शरद पवारांचं म्हणणं आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारनं बापट समिती नेमली होती. या समितीनं मराठा समाजाला आरक्षण देऊ नये अशी भूमिका घेतली होती. हा अहवाल बाजूला करून सरकारनं आरक्षण द्यावं अशी आग्रही मागणी पवारांनी यावेळी केली.

close