‘ शांतता कोर्ट चालू आहे ‘ नव्या रुपात

January 6, 2009 2:47 PM0 commentsViews: 60

6 जानेवारी, मुंबईमाधुरी निकुंभ विजय तेंडुलकरांच्या स्मृतिदिनाचं औचित्य साधून ' शांतता कोर्ट चालू आहे ' या नाटकाची डिव्हिडी आणि व्हिसीडी लाँच करण्यात आली. या व्हिसीडीचं लाँचिंग सुलभा देशपांडेच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. विजय तेंडुलकरांच्या शांतता कोर्ट चालू आहे या नाटकाने अनेक विक्रम मोडलेच पण त्यामुळे भ्रुणहत्येसारखा एक मोठा प्रश्न 1967 साली सगळ्यांपुढे मांडला. या नाटकात अभिनेत्री सुलभा देशपांडे मध्यवर्ती भूमिकेत होत्या. तेंडुलकरांना श्रध्दांजली म्हणून दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी हेच नाटक नव्या संचात पुन्हा उभं केलं. एव्हरेस्ट कंपनीच्या माध्यामातून याची व्हिसीडी करण्यात आली. नाटकात मिस बेणारेंच्या मुख्य भूमिकेत आहे रेणुका शहाणे. यावेळी प्रत्येकाने विजय तेंडुलकरांच्या आठवणींना उजाळा देताना हे नाटक नवीन पिढीपर्यंत सीडीमार्फत पोहचलं याबद्दल आनंद व्यक्त केला.

close