ऑस्ट्रेलियाने सिडनी टेस्ट जिंकली

January 7, 2009 6:46 AM0 commentsViews: 1

7 जानेवारी सिडनीसिडनी टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा 103 रन्सनी पराभव केला. ही टेस्ट मॅच जिंकल्यामुळे ऑस्ट्रेलियाने आपलं आयसीसी क्रमवारीतलं अव्वल स्थानही कायम राखलंय. टेस्टच्या पाचव्या दिवशी दक्षिण आफ्रिकेची दुसरी इनिंग 272 रन्समध्ये संपुष्टात आली. डिव्हिलिअर्सने हाफ सेंच्युरी करत आफ्रिकेची इनिंग सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे इतर बॅट्समन मात्र पीचवर टिकून राहू शकले नाहीत. ऑस्ट्रेलियन बॉलर्सच्या चमकदार कामगिरीमुळे ठराविक अंतराने त्यांच्या विकेट्स गेल्या. सकाळी 150 रन्सच्या आसपास त्यांनी पहिले 6 बॅट्समन गमावले. तेव्हाच मॅचची दिशा स्पष्ट झाली . मॅकेंझी 27, कॅलीस 4 तर ड्युमिनी फक्त 16 रन करून आऊट झाले. डेल स्टेन आणि निटनी यांनी नवव्या विकेटसाठी 50 रन्सची पार्टनरशिप करून ऑस्ट्रेलियाचा विजय लांबवला. अखेर डावा हात फ्रॅक्चर झालेला असतानाही कॅप्टन स्मिथ बॅटिंगला आला. पण तो फक्त 3 रन्स करून आऊट झाला आणि ऑस्ट्रेलियाला विजय मिळाला. ऑस्ट्रेलियातर्फे पीटर सिडलने 3 तर बॉलिंजरने 2 विकेट्स घेतल्या.

close