नागपूरमध्ये वाढत्या अपघातांची नागरिकांना धास्ती

January 7, 2009 7:19 AM0 commentsViews: 1

7 जानेवारी, नागपूरप्रशांत कोरटकरनागपूर शहरात रस्त्याच्या कडेला असलेल्या शाळांनी अपघातांचा धसका घेतलाय. मागील आठवड्यात प्रकाश विद्यालयात ट्रक घुसल्याने एका विद्यार्थाचा मृत्यू झाला होता. त्यामुळं हायवे शेजारच्या शाळांमध्ये भीतीचं वातावरण आहे. नागपुरात तीनशेच्या वर लहान मोठ्या शाळा आहेत. त्यातल्या अनेक शाळा मुख्य रस्त्याच्या कडेला किंवा हायवेला लागून आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका इथ जास्त आहे. "या भागात सावधानतेचे बोर्ड नाहीत, चालक भरमसाठ वेगात येतात. त्यामुळे आम्हा सगळ्यांना जीव मुठीत धरून वावरावं लागतं" असं नागपूरमधील मुंडले स्कूलच्या मुख्याध्यापिका मेघा पाध्ये यांनी सांगितलं. तर "पोलिसांनी मनावर घेतलं तर ते चागल्या पद्धतीनं वाहतुकीचं नियोजन करू शकतात असं साउथ पॉइन्ट स्कूलच्या मुख्याध्यापिका रसिका दस्तुरे यांनी सांगितलं."पोलीस मात्र बेजबाबदार प्रशासन आणि बेफाम वाहनचालकांवर दोष ढकलून मोकळे होत आहेत. "चालकांनी स्पीड कमी ठेवायला हवा. अती वेगामुळेच अपघात होत आहेत" असं पोलीस सहआयुक्त बी. जे. कांगाले यांनी सांगितलं.नागपूर शहरातून जाणा-या हायवेवरून दिवसाला शेकडो भरधाव ट्रक ये जा करतात. पोलिसांनी फक्त आर्थिक फायदे पहाण्यापेक्षा, हायवेला लागून असलेल्या शाळांच्या आधीच या ट्रकचा वेग कमी करण्यासाठी उपाययोजना करायला हव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे.

close