सत्यमच्या सीईओंचा राजीनामा

January 7, 2009 7:46 AM0 commentsViews: 1

7 जानेवारीसत्यमचे अध्यक्ष रामलिंगम राजू यांनी आज अखेरीस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. अनेक गौप्यस्फोट करत त्यांनी हा राजीनामा दिलाय. कंपनीच्या अकाऊंटसमध्य आपण फेरफार केले आणि गेले अनेक वर्ष हे सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. कंपनीच्या बॅलन्सशीटमध्ये 5,040 कोटींचा फेरफार केल्याचं त्यांनी कबूल केलं आहे.दरम्यान सत्यमचे नवे कार्यवाहक सीईओ म्हणून राम म्यानमपती यांची निवड झाली आहे. राजू यांनी आपण कायदेशीर कारवाईसाठी तयार असल्याचं सांगितलं आहे. राजू यांच्या या राजीनाम्यानंतर कंपनीचा शेअर 70 टक्क्यांनी घसरला आहे.

close