आजी-माजी मुख्यमंत्र्यामध्ये जुंपली

January 7, 2009 10:36 AM0 commentsViews: 2

7 जानेवारी लातूरआयुक्तालय नांदेडला नेण्याच्या निर्णयाबाबत लातूरमधील लोकप्रतिनिधी लवकरच राज्यपालांची भेट घेणार आहेत. यात सर्वपक्षीय आमदार आणि खासदार असतील. आयुक्तालय नांदेडला नेण्याचा निर्णय रद्द करावा अशी मागणी यावेळी राज्यपालांकडे करण्यात येईल. मंगळवारी लातूर बंद पाळण्यात आला. त्यानंतर आता राज्यपालांना भेटण्याचं पाऊल उचलण्यात आलं आहे. यावरून नांदेड इथं विभागीय आयुक्तालय नेण्याचा मुख्यमंत्र्याचा निर्णय रोखण्यासाठी विलासराव देशमुख आता थेट मैदानात उतरणार असं दिसतंय.नांदेडमध्ये आयुक्तालय नेण्याच्या निर्णयाबाबत लातूरच्या नगराध्यक्ष व्यंकटेश बेंद्रे सांगतात, हा निर्णय घाई-गडबडीत घेतलेला दिसतोय. तसंच या निर्णयावर राजकीय रंग दिसतो. त्यामुळे गुणवत्तेचा विचार करावा. लातूरची मागणी असाताना नांदेडमध्ये आयुक्तालय होणं म्हणजे लातूरकरांची संधी काढून घेण्यासारखं आहे.याबाबत माजी राज्यमंत्री भास्करराव खतगांवकर सांगतात, हा निर्णय लातूरकरांनी खिलाडूवृत्तीने द्यावा. याआधी अनेक कार्यालये लातूरमध्ये नेण्यात आली त्यावेळी कोणती समिती नेमली नव्हती म्हणून लातूरकरांनी या निर्णयाबाबत मोठा वाद निर्माण करू नये.

close