केविन पीटरसनचा राजीनामा

January 7, 2009 11:10 AM0 commentsViews: 2

7 जानेवारी इंग्लंडचा कॅप्टन केविन पीटरसनने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून पीटरसन आणि इंग्लंड टीमचे कोच पीटर मूर्स यांच्यात मतभेद सुरू होते. मूर्स यांना कोच पदावरून हटवावं असं वक्तव्य पीटरसननं केलं होतं. टीम कोच पीटर मूर्स यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मंगळवारी इसीबीच्या 12 जणांची टेलिकॉन्फरन्सद्वारे मीटिंग झाली होती. आणि त्यात कोच आणि पीटरसन यांच्यातला वाद चव्हाट्यावर आल्यामुळे ईसीबीने नाराजी व्यक्त केली होती. मूर्स यांच्या इंग्लंड टीमबरोबरच्या भविष्याबद्दल पीटरसनने वक्तव्य केलं होत. वेस्ट इंडिजचा दौरा करण्याआधीच या दोघांनी राजीनामा दिल्यामुळे आता इसीबीसमोरही मोठ आव्हान निर्माण झालं आहे.पाच महिन्यापूर्वीच पीटरसन इंग्लंडचा कॅप्टन झाला होता.

close