लाचखोर निबंधकाला कोल्हापुरी हिसका

January 7, 2009 12:19 PM0 commentsViews: 7

7 जानेवारी कोल्हापूरप्रताप नाईककोल्हापूर जिल्ह्यातील नियोजित श्री कृष्ण सहकारी दूध संस्थेचं रजिस्ट्रेशन करायला येथील सहाय्यक निबंधक टाळाटाळ करीत होता. आज या सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध)अधिका-याला ग्रामस्थांनी चांगलंच धारेवर धरलं. त्याचबरोबर संस्थेचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी त्याला दिलेली लाच सगळ्यांसमोर परत घेतली.हा अधिकारी रजिस्ट्रेशनसंबधी कामासाठी नेहमीच टाळाटाळ करून पैशाची मागणी करायचा. पण आज या संस्थेसोबत इतरही संस्थेच्या सदस्यांनी एकत्र येऊन निबंधकाला चांगलंच धारेवर धरलं. त्याच्याकडून नोंदणीप्रमाणपत्र घेतलंच शिवाय याकामासाठी त्यांनी दिलेले 25,000 रुपयेही त्याच्याकडून परत घेतले. या अधिका-याने लाच घेतली हे आता उघड झालं असलं तरी या लाचखोर अधिका-याला निलंबित केलं जाईल का हाच प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.

close