‘मुन्नाभाई चले जेल’

May 15, 2013 3:21 PM0 commentsViews: 43

मुंबई 15मे : बॉलिवूडचा अभिनेता संजय दत्त उद्या मुंबईच्या टाडा न्यायालयाला शरण जाणार आहे. आज त्याने पुण्याच्या येरवडा न्यायालयात शरण जाण्याची याचिका परत घेतली. पण तरीही त्याला होणारा विरोध कायम आहे. मुंबईत संजय दत्तच्या घराबाहेर हिंदू राष्ट्र सेनेनं निदर्शनं केली. संजय दत्त देशद्रोही आहे. त्यामुळे त्याला अधिक कठोर शिक्षा व्हावी अशी त्यांनी मागणी केली. त्यातच आर्थर रोड जेलमधल्या अधिकार्‍यांना एक धमकीचं पत्र मिळालंय. संजय दत्त आला तर त्याला जीवे मारू असं पत्रात म्हटलं आहे. पण असं असूनही संजय दत्तने आपली थेट पुण्यात शरण येण्याविषयीची याचिका मागे घेतलीये. त्यामुळे आता संजय गुरुवारी टाडा कोर्टातच शरण येणार हे स्पष्ट झालंय.

पण जेलमध्ये गेल्यानंतर संजय दत्तला सहानुभूती मिळेल.. आणि त्यानंतर तो बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करेल, अशी भीती स्फोटातल्या पीडितांना वाटतेय. 1993 साली झालेल्या बाँबस्फोट प्रकरणी बेकायदेशीर पद्धतीने शस्त्रास्त्र बाळगण्याबद्दल संजयला दत्तला दोषी ठरवण्यात आलं आहेत. त्यासाठी त्याला आता साडे तीन वर्ष जेलमध्ये जावं लागणार आहे. गेल्या चार आठवड्यांच्या मुदतवाढीत संजूबाबाने पोलिसगिरी, पी.के आणि अलिबाग या सिनेमांचं शूटिंग पूर्ण केलं. जंजीर, उंगली, तक्रार आणि वसूली या सिनेमांचं शूटिंग मात्र अद्यापही अपूर्ण आहे. संजयला सुनावलेल्या शिक्षेमुळे निर्मात्यांचे जवळपास 278 कोटी रुपये पणाला लागले आहेत.

close