बेडसेंच्या बदली मागे दडलंय काय ?

May 15, 2013 4:08 PM0 commentsViews: 59

दीप्ती राऊत, नाशिक

नाशिक 15 मे : लाचखोर अभियंते चिखलीकर वाघ यांच्यासोबतच नाव घेतलं जातंय ते सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचे ओएसडी संदीप बेडसे यांचं. सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये पोस्टिंग किंवा बदल्यांचे मुख्य सूत्रधार म्हणून बेडसे काम करतात असं बोललं जातं. कोण आहे हा बोडसे याबद्दलचा हा रिपोर्ट..

आपण वरिष्ठ अधिकार्‍यांना देण्यासाठी पैसे गोळा करत होतो, असा दावा लाचखोर अभियंता चिखलीकर यांने केला आणि संदीप बेडसेंच्या नावाची चर्चा सुरू झाली. भुजबळांचे ओएसडी असलेले बेडसे PWD विभागातल्या बदल्या आणि पोस्टींगचे खरे सूत्रधार आहेत असं बोललं जातं. भाजप नेते किरीट किरीट सोमय्यांनीही तसे आरोप केले. आणि त्यानंतर बेडसेंची तडकाफडकी बदली करण्यात आली. पण बेडसेंवर कारवाईची मागणी सोमय्या यांनी केली.

सार्वजनिक बांधकाम विभागात अधिकारी असलेल्या संदीप बेडसेंनी आपला वाढदिवस अगदी जंगी साजरा केलाय. हे संदीप बेडसे आहेत तरी कोण..

कोण आहेत बेडसे?

- मूळचे धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातल्या छिंदवेलचे रहिवासी- सर्वप्रथम कोकण विभागात शाखा अभियंता- 10 वर्षांपूर्वी मलबार हिल विभागात शाखा अभियंता म्हणून बदली- मंत्रालय आणि मंत्री बंगल्यांच्या देखभालीच्या कामाची जबाबदारी- याच काळात भुजबळांशी ओळख- भुजबळांचे विशेष सहाय्यक अधिकारी म्हणून रुजू- शिंदखेडा मतदार संघातून विधानसभेसाठी इच्छुक- भाऊ रिंकू बेडसे PWDसाठी कंत्राटदार- दुसरा भाऊ संजय बेडसे धुळे जि.प.त राष्ट्रवादीतून विजयी

म्हणूनच सुरुवातीला छगन भुजबळांनी बेडसेंची पाठराखणच केली होती. भुजबळांनी आपल्या ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटीचं आधी समर्थन केलं आणि नंतर तडकाफडकी बदली केली. यामुळे संशयाचं वातावरण नक्कीच निर्माण होतंय.

close