संपात सहभागी नसलेल्या वाहनांची तोडफोड

January 7, 2009 7:26 AM0 commentsViews: 1

7 जानेवारी मुलुंड चेकनाका परिसरात ट्रान्सपोर्ट मालकांचा संप सुरू आहे. पण संपामध्ये सहभागी न होणा-या चार वाहनांची तोडफोड करण्याचा प्रयत्न या संपातील सहभागी असलेल्या लोकांनी केला. आणि यावेळी दोन ट्रकच्या काचा तोडण्यात आल्या. तर दोन ट्रकच्या टायरची हवा काढण्यात आली. या संपामध्ये प्रत्येक ट्रक मालक, ट्रक ड्र्‌ायव्हर यांनी सहभाग घेणं अत्यावश्यक असल्याचं सघटनेनं म्हटलंय. आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी ट्रान्सपोर्ट मालकांनी 4 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून संप पुकारलाय. दरम्यान, कोल्हापूरमध्येही संपात सहभागी न झालेले ट्रकचालक सामान भरून निघाले होते तेव्हा त्यांच्यावर लॉरी असोसिएशनच्या सदस्यांनी दगडफेक केली. तसंच त्यांच्या ट्रकच्या चाकांची हवा सोडून ते ट्रक तिथेच थांबवण्याचा प्रयत्नही या आंदोलकांनी केला.

close