असं झालं स्पॉट फिक्सिंग !

May 16, 2013 2:01 PM0 commentsViews: 23

नवी दिल्ली 16 मे : संपूर्ण क्रिकेट जगतला धक्का देणार्‍या आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणाचा दिल्ली पोलिसांनी पुराव्यानिशी खुलासा केला आहे. हे फिक्सिंग कसं झालं याच्या व्हिडिओ क्लिपिंग्ज त्यांनी हे त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवली. या फिक्सिंगमध्ये मुंबई अंडरवर्ल्डचा हात आहे आणि फिक्सिंगचे मास्टरमाईंड परदेशात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. या स्पॉट फिक्सिंगची चौकशी पोलीस एप्रिलपासून करत होते. प्रत्येक मॅचमध्ये दिल्ली पोलिसांचं पथक उपस्थित होतं. अंकित चव्हाणवर पोलिसांची नजर होती. बुधवारच्या मॅचमध्ये अंकित चव्हाण आम्हाला दोषी आढळला. आणि सर्व पुरावे सापडल्याने पोलिसांनी अखेर तिघांना अटक केली.

अजित चंडिलाची फिक्सिंग

5 मे रोजी जयपूरमध्ये पुणे वॉरिअर्सविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये अजित चंडिलानं पहिल्यांदा स्पॉट फिक्सिंग केल्याचा खुलासा दिल्ली पोलिसांनी केला. चांदिलियाच्या स्पेलमध्ये दुसर्‍या ओव्हरमध्ये अजित 20 रन्स देणार हे ठरलं होतं आणि त्यासाठी किंमत 20 लाख पक्की झाली होती. पण या मॅचमध्ये अजित चांदिलियानं ठरलेली खूण ओव्हरअगोदर बूकीजना दिली नाही त्यामुळे या मॅचचे पैसे अजित चांदिलियाकडून बूकीजनं परत मागितले होते. – 5 मे 2013, जयपूर – राजस्थान रॉयल्स विरुद्ध पुणे वॉरियर्स- दुसर्‍या ओव्हरला 14 पेक्षा जास्त रन्स देण्यासाठी 20 लाख रुपये – बूकीजना खूण दिली नाही, त्यामुळे बूकीजनं पैसे मागितले परत

श्रीसंतची फिक्सिंग

9 मे रोजी मोहालीमध्ये पंजाब किंग्ज इलेव्हन विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये श्रीसंतनं स्पॉट फिक्सिंग केल्याचा खुलासा पोलिसांनी केला. श्रीसंतनं त्याच्या स्पेलच्या दुसर्‍या ओव्हरमध्ये 14 पेक्षा जास्त रन्स देण्याचं मान्य केलं होतं. त्यासाठी त्यानं आपण टॉवेल आपल्या पँटला लावू ही खूण ठरवली होती.

- 9 मे 2013, मोहाली- राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब- पँटमध्ये टॉवेल लावण्याची ठरली होती खूण

अंकित चव्हाणची फिक्सिंगतर 15 मे रोजी मुंबईमध्ये मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये अंकित चव्हाणने स्पॉट फिक्सिंग केल्याचा खुलासा पोलिसांनी केला. अंकितनं त्याच्या स्पेलच्या दुसर्‍या ओव्हरमध्ये 14 पेक्षा जास्त रन्स देण्याचं कबूल केलं होतं. आणि त्यासाठी त्याला 60 लाख रुपये दिले गेले. पण हे डील अंकित चव्हाणनं केलं नव्हतं तर अजित चांदिलियानं अंकित चव्हाणला भुरळ घालत स्पॉट फिक्सिंग करायला भाग पाडलं होतं.

- 15 मे 2013, मुंबई- राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स- दुसर्‍या ओव्हरला 14 पेक्षा जास्त रन्स देण्यासाठी 60 लाख रुपये – अजित चंडिलानं अंकित चव्हाणला स्पॉट फिक्सिंगसाठी केलं तयार

#SpotFixing

close