रंगभूमीसाठी नाना आतूर

January 7, 2009 12:58 PM0 commentsViews: 12

7 जानेवारी मुंबईआविष्कारच्या अरविंद देशपांडे महोत्सवात नाना पाटेकर यांनी पुन्हा नाटकात काम करण्याची इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली.विजयाबाईंनी आपल्यासाठी एक नाटक करावं आणि महेश एलकुंचवारांनी एक नाटक द्यावं अशी नानानं जाहीर विनंती केली.कार्यक्रमाच्यावेळी बोलताना नाना म्हणाला, सिनेमामध्ये राहत असताना तिथलं नाव आणि पैसा यात आम्ही नाटक विसरतो. पण आपण चुकतोय मुळात जिथून सुरू झालो त्याकडे आपलं दुर्लक्ष होतंय म्हणून आपण कृतघ्न आहोत. यावेळी महेश एलकुंचवार त्यांच्या एका नटाचा मृत्यू या नाटकात काम करण्याची इच्छा नानांनी व्यक्त केली.या महोत्सवाच्या निमित्तानं रंगायन आणि आविष्कारशी संबंधित नव्या-जुन्या मित्रांचं संमेलनच भरलं होतं. हा क्षण विजयाबाई, एलकुंचवार आणि नाना सर्वांच्याच दृष्टीनं भावनिक होता. पण आपल्या सर्वांच्या दृष्टीनं मात्र मोठा ऐतिहासिक आणि आनंदाचा ठरण्याची शक्यता आहे.कारण विजयाबाई आणि एलकुंचवारांनी ठरवलं तर आपल्याला नानांची दोन मराठी नाटकं पाहायला मिळू शकतात.

close