हायकमांडही राजी

January 7, 2009 2:08 PM0 commentsViews: 3

7 जानेवारी दिल्लीनारायण राणेंच्या भवितव्याचा निर्णय घेण्यासाठी दिल्लीत सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि राज्य काँग्रेसचे प्रभारी ए. के. अ‍ॅन्टोनी, तसंच सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेलही उपस्थित आहेत. राणेंचं काँग्रेस पक्षातलं निलंबन रद्द व्हावं, यासाठी मुख्यमंत्री चव्हाण यांनी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पक्ष हायकमांडही राणेंच निलंबन रद्द करण्याबद्दल अनुकूल आहे. पण अंतिम निर्णयासाठी दोन दिवसांची वाट पाहावी लागेल असं समजतंय.

close