अमरसिंगांचं घुमजाव

January 7, 2009 2:36 PM0 commentsViews: 1

7 जानेवारी दिल्लीभारतानं पाकिस्तानमधल्या दहशतवादी अड्डयांवर हल्ला केला नाही तर केंद्रातल्या सरकारचा पाठिंबा काढू अशी धमकी समाजवादी पार्टीने दिली होती. पण समाजवादी पक्षाचे नेते अमरसिंग यांनी आता या भूमिकेपासून घुमजाव केलं. परंतु पाकिस्तानवर कडक कारवाई करण्याबाबतची समाजवादी पक्षाची भूमिका मात्र कायम आहे.दिल्लीत सोनिया गांधी यांच्या भेटी अगोदर पत्रकरांशी बोलताना अमरसिंग म्हणाले होते की, मी सोडून पक्षातले अनेक खासदारांनी पाठिंबा काढून घ्यावा असा दबाव त्यांच्यावर आणला आहे त्यामुळे पाकिस्तानवर कारवाई झाली नाही तर पाठिंबा काढून घेतला जाईल. पण आता, सोनिया गांधी यांच्याबरोबरच्या बैठकीनंतर त्यांनी सरकार पाकिस्तानबाबत योग्य ते धोरण अवलंबत आहे. आणि सोनिया गांधीच्या स्पष्टीकरणानंतर कोणताही संकोच राहिलेला म्हणून केंद्र सरकारला आपल्या पक्षाचा पाठिंबा चालू राहील असं अमरसिंगांनी स्पष्ट केलं.

close