इस्रायलच्या हल्ल्यात 600 ठार

January 7, 2009 4:46 PM0 commentsViews: 5

7 जानेवारी गाझागाझापट्टी अजूनही धुमसतेय. हमासच्या तळांवर हल्ले करणा-या इस्त्रायली फौजांनी नागरी भागातही हल्ले केले आहेत. गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेल्या या धुमश्चक्रीत 600 पेक्षाही जास्त लोकांचा बळी गेला आहे. इस्रायलच्या या हल्ल्यांचा रेडक्रॉसच्या आंतरराष्ट्रीय समितीने धिःकार केलाय. इस्त्रायली आक्रमण शांत होण्याची कुठलीही चिन्ह दिसत नाहीत, याबद्दलही रेड क्रॉसनं चिंता व्यक्त केली आहे. इस्त्रायलच्या लढाऊ विमानांनी मंगळवारी संयुक्त राष्ट्रांच्या शाळेबाहेर हल्ला केला. तिथल्या अल-फखुरा शाळेत जवळपास 350 लोकांपेक्षाही जास्त लोकांनी आश्रय घेतला आहे. शाळेवरच्या हल्ल्यात 42 निष्पाप लोक मरण पावल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. इस्त्रायली फौजा आणि हमास यांच्यातील गोळीबारापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी या शाळेत आश्रय घेतला होता. पण विमानातून झालेल्या बॉम्बफेकीमुळे त्यांच्यापैकी 42 जणांचा मृत्यू झाला.

close