पवारांच्या आदेशाला हरताळ, पालिकेनं धुतले पाण्याने रस्ते !

May 18, 2013 4:36 PM0 commentsViews: 18

भिवंडी 18 मे : महाराष्ट्राच्या काही भागात भीषण दुष्काळी परिस्थिती असताना राज्यातल्या इतर ठिकाणच्या लोकांनी पाणी जपून वापरावं अशी सूचना केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी अगदी सुरुवातीला केली होती. पण त्यांच्या या सूचनेलाच हरताळ फासलाय भिवंडीतल्या प्रशासनानं…भिवंडी निजामपूर महापालिकेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करण्यासाठी शरद पवार भिवंडीत येणार म्हणून त्यांच्या स्वागतासाठी भिवंडीतले रस्ते चक्क पाण्याने धुतले जात आहेत. विशेष म्हणजे भिवंडी आणि ठाणे ग्रामीण परिसरात प्रचंड पाणीटंचाई असतानाही हा धाडसी खटाटोप भिवंडीतल्या प्रशासनानं कसा केला,याची चर्चा आता सुरु झालीय.

close