एक नजर ‘सत्यम’ घोटाळ्यावर

January 8, 2009 5:31 AM0 commentsViews: 1

8 जानेवारीअफरातफर केल्याची कबुली देत सत्यमचे सीईओ रामलिंगम राजू यांनी राजीनामा दिला आणि खळबळ उडाली. बॅलन्सशीटमध्ये फेरफार केल्याचं त्यांनी मान्य केलंय. त्यामुळे सत्यमचे शेअर्स एका दिवसात तब्बल 72 टक्क्यांनी कोसळले. हा घोटाळा नेमका होता तरी काय ? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.2009च्या दुसर्‍या तिमाहीत पूर्णपणे खोटी बॅलन्सशीट भागधारकांना पाठवण्यात आली. या बॅलन्सशीटमध्ये 5,040 कोटींची जमा असल्याची खोटी नोंद होती. तसंच 376 कोटींचं कर्ज घेतल्याचंही या बॅलन्सशीटमध्ये म्हटलं होतं. सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनीची कमाई फक्त 2,112 कोटी रुपये असताना ही कमाई 2,700 कोटी दाखवण्यात आली होती. या तिमाहीत ऑपरेटिंग मार्जिन फक्त 61 कोटी रुपये असताना ते वाढवून 649 कोटी रुपये दाखवण्यात आलं होतं. मेटासबरोबर सौदा करुन या सर्व अफरातफरीवर पांघरुण घालण्याचा राजू यांचा इरादा होता. राजू यांनी गेल्या दोन वर्षांपासून त्यांचे शेअर्स गहाण ठेवून त्यावर 1,230 कोटींचं कर्ज उचललं होतं.

close