लातूरमधील स्फोटामागे घातपात नाही -सतेज पाटील

May 11, 2013 5:06 PM0 commentsViews: 30

लातूर 11 मे : नळेगाव इथं बसमध्ये झालेल्या स्फोटामागे घातपात नसल्याचं गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी स्पष्ट केलं. उद्यापर्यंत या प्रकरणाची ठोस माहिती जाहीर करू असंही त्यांनी सांगितलं. या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी नांदेड, औरंगाबाद आणि पुणे एटीएसची पथकं नळेगावात दाखल झाली आहेत. शुक्रवारी संध्याकाळी 7 च्या सुमारास स्टँडवर उभ्या एसटी बसमध्ये स्फोट झाला होता. या स्फोटात 19 जण जखमी झाले असून यातील 3 जणांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, आज नळेगावाच्या ग्रामस्थांनी पोलिसांच्या लेट लतीफ कारभाराविरोधात बंद पुकारला होताय या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

close