मुंबईचा पुण्यावर विजय

May 11, 2013 5:40 PM0 commentsViews: 41

10 मे

आज आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने पुणे वॉरिअर्सचा 5 विकेटने पराभव करत पॉईंट टेबलमध्ये दुसर्‍या क्रमांकावर झेप घेतली. टॉस जिंकून पहिली बॅटिंग करणार्‍या पुण्याने मुंबईसमोर 8 विकेट गमावत 113 रन्सचं माफक आव्हान ठेवलं होतं. मनिष पांडे आणि युवराज सिंग वगळता पुण्याच्या एकाही बॅट्समनला मोठा स्कोर करता आला नाही. ओपनर्स रॉबीन उथप्पा आणि ऍरॉन फिंच झटपट पॅव्हेलियनमध्ये परतले. मनिष पांडेनं 29 तर युवराज सिंगनं 33 रन्स केले. मुंबईतर्फे लसिथ मलिंगा, अबू नेचीम आणि मिचेल जॉन्सनने प्रत्येकी 2, तर हरभजन सिंगनं 1 विकेट घेतली. मुंबईच्या इनिंगची सुरुवातही तितकीच खराब झाली. इनिंगच्या पहिल्याच बॉलवर अशोक दिंडाने ड्वेन स्मिथला क्लीन बोल्ड केलं. तर सचिन तेंडुलकर फक्त 15 रन्सवर पॅव्हेलियनमध्ये परतला. कार्तिकने 17 रन्स केले तर रायडूनं 26 रन्स केले. कॅप्टन रोहित शर्माने 37 रन्स केले.

close