महालक्ष्मी रेसकोर्सवर बाळासाहेबांच्या स्मारकाचा सेनेचा मनसुबा

May 13, 2013 10:10 AM0 commentsViews: 49

मुंबई 13 मे : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबत शिवसेनेनं पुन्हा एकदा आग्रहाची मागणी केली आहे. यावेळी स्मारकासाठी जागा आहे ती मुंबईतील ह्रदयस्थनी असलेल्या महालक्ष्मी रेसकोर्स. रेसकोर्सची साडे आठ लाख चौरस मीटर जागेचा गरीबांना काहीही उपयोग होत नाही, म्हणून तिथे बगीचा बांधावा अशी मागणी सत्ताधारी शिवसेनेने आयुक्तांकडे केली आहे.

31 मे रोजी रेसकोर्सची लीज संपतेय. ही लीज न वाढवता तिथे गार्डन बनवा अशी मागणी महापौर सुनील प्रभूंनी केली आहे. या जागेवर बाळासाहेबांचं स्मारक बनवण्याचा शिवसेनेचा मनसुबा आहे अशा स्वरूपाच्या बातम्यांवर उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिक्रिया दिलीये.

बाळासाहेबांच्या स्मारकाचा आमचा प्रस्ताव नाही. पण असा प्रस्ताव कुणी ठेवणार असेल तर त्याला आमचा पाठिंबा असेल अस उध्दव ठाकरे यांनी म्हटलं आहे. या अगोदर दादर येथील शिवाजी पार्कवर बाळासाहेबांचं स्मारक व्हावे अशी मागणी करत शिवसेनेनं पार्कची जागा सोडण्यास नकार दिला होता. मात्र पालिकेच्या आश्वासनानंतर ही पार्कची जागा सोडण्यात आली आहे.

ज्या ठिकाणी बाळासाहेबांवर अंत्यसंस्कार झाले होते त्या ठिकाणी आता बगीचा उभारण्यात येत आहे. मात्र स्मारकाबाबत कोणताही निर्णय झाले नाही. बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर बंगल्याची जागा निश्चित करण्यात आली आहे. पण तरीसुद्धा शिवसेनेची शोध मोहिम सुरू आहे. आता ही शोध मोहिम महालक्ष्मी रेसकोर्सवर येऊन थांबली आहे.

महालक्ष्मी रेसकोर्स का ?

- येत्या 31 मे रोजी रेसकोर्सची लीज संपणार- रेसकोर्सची एकूण जागा 'साडे आठ लाख चौरस मीटर – मुंबईच्या मध्यस्थानी असलेली ही जागा

close