‘सत्यम’ साठी आंध्र प्रदेशचा पुढाकार

January 8, 2009 5:28 AM0 commentsViews: 2

8 जानेवारी, हैदराबादसत्यम इन्फोटेकमधल्या घोटाळ्यानंतर कंपनीच्या 53 हजार कर्मचार्‍यांना दिलासा देण्यासाठी आंध्रप्रदेश सरकार पुढं आलंय. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस.राजशेखर रेड्डी यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून एक मागणी केली आहे. यात त्यांनी सत्यम कंपीनची पत सावरण्यासाठी अजीम प्रेमजी, रामदोराई आणि नारायण मूर्ती यांचा समावेश असलेली एक व्यवस्थापकीय समिती स्थापन करावी अशी मागणी केली आहे. 11 हजार कोटी रुपयांची कंपनी असलेल्या सत्यम इन्फोटेकच्या बॅलन्सशीटमध्ये नफा फुगवून दाखवला अशी कबुली रामलिंग राजू यांनी राजीनामा पत्रात दिली आहे. कंपनीच्या अकाऊंटमध्ये आपण फेरफार केले आणि गेले अनेक वर्ष हे सुरू होतं, असं त्यांनी सांगितलंय. राजू यांच्या राजीनाम्यानंतर कंपनीचा शेअर 70 टक्क्यांनी घसरलाय. दरम्यान, सत्यमचे नवे कार्यवाहक सीईओ म्हणून राम म्यानमपती यांची निवड झाली आहे.आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांनी मात्र सावध पवित्रा घेतला आहे. "जो काही निर्णय घ्यायचाय, तो केंद्र सरकार आणि सत्यम यांनी मिळून घ्यायचा आहे. तसं आम्ही पंतप्रधानांना याआधीच कळवलं आहे." असं ते म्हणाले. मात्र याच वेळी "गरज भासल्यास आपली मदतीची पूर्ण तयारी आहे" असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

close