रॅगिंग प्रकरणी दोन विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द

May 13, 2013 10:29 AM0 commentsViews: 10

नवी मुंबई 11 मे : डी.वाय पाटील कॉलेजमधल्या विद्यार्थी रॅगिंगप्रकरणी दोन विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करण्यात आला आहे. इंजिनियरिंग कॉलेजच्या नितीन पडळकर या विद्यार्थ्याने रॅगिंगला कंटाळून शनिवारी आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यानं चिठ्ठी लिहीली होती. त्यात गौरव मडवी आणि प्रदीप पाईकराव या दोन विद्यार्थ्यांची नावं होती. या दोन्ही विद्यार्थ्यांवर प्राचार्यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबनाची कारवाई केली आहे. नितीन पडळकर डी.वाय पाटील कॉलेजमध्ये इंजिनियरिंगच्या दुसर्‍या वर्षाला शिकत होता.

close