डोंबिवलीत केमिकल कंपनीची आग आटोक्यात, 1 जणांचा मृत्यू

May 13, 2013 10:37 AM0 commentsViews: 7

मुंबई 13 मे : डोंबिवली एमआयडीसीमध्ये केम्पस्टार केमिकल कंपनीत आज सकाळी पावणे सहाच्या सुमारास लागलेली आग आटोक्यात आली आहे. या आगीत एका कामगाराचा मृत्यू झालाय. कंपनीत असलेले 5 कामगार 40 ते 50 टक्के भाजले. जखमींना गांधानगरच्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

आग विजवण्यात अग्निशमन दलाला यश मिळालंय. गेल्या दोन वर्षात या परिसरात आग लागण्याची ही दहावी वेळ आहे. सकाळी कंपनीत 8 ते 10 स्फोट झाल्याचा आवाज झाले. यामुळे जवळपासचा एक ते दीड किमीचा परीसर हादरुन गेला. त्यामुळे या परिसरातील लोक घाबरून रस्त्यावर आले. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरलेत.

अग्निशमन दलाच्या 3 बंब आणि काही खाजगी टँकरनी ही आग विझवली. तर तीन बाजूंना भिंती असल्यामुळे पाण्याचा मारा करायला एकच बाजू उपलब्ध होती. यामुळे आगीवर नियंत्रण मिळवायला वेळ लागला. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यात यश मिळालंय.

close