‘मेडिकल प्रवेशासाठी ‘नीट’चे मार्क बंधनकारक नाहीत’

May 13, 2013 11:49 AM0 commentsViews: 15

नवी दिल्ली 13 मे : मेडिकलच्या या वर्षीच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झालाय. सुप्रीम कोर्टाने अंतरिम आदेश देताना स्पष्ट केलंय की, या वर्षी नीट (NEET) या राष्ट्रीय प्रवेश परीक्षेचा स्कोअर या वर्षीच्या प्रवेशांसाठी बंधनकारक नाही. ग्रॅजुएशन आणि पोस्ट ग्रॅजुएशनच्या सुमारे 90 हजार विद्यार्थ्यांसाठी हा निकाल महत्त्वाचा आहे.

विविध संस्थांनी घेतलेल्या प्रवेश परीक्षांचे निकाल स्थगित करण्यात आले होते. ती स्थगिती आता सुप्रीम कोर्टाने उठवली आहे. ज्या संस्थांना नीटचे मार्क ग्राह्य धरायचे असतील त्यांनी धरावेत. तर ज्यांना प्रवेश परीक्षांच्या मार्कांवर ऍडमिशन्स द्यायच्या असतील त्यांनी तशा द्याव्यात असे पर्याय कोर्टाने सध्यापुरते दिले आहेत. याबाबतचा अंतिम निकाल जुलैच्या पहिल्या आठवड्यात दिला जाईल.

close