पंतप्रधानांची खुर्ची धोक्यात पण..

May 13, 2013 4:45 PM0 commentsViews: 39

नवी दिल्ली 13 मे : पंतप्रधान आणि काँग्रेस पक्षातला एक मोठा गट यांच्यात मतभेद असल्याची चर्चा सुरू झालीय. पंतप्रधान मनमोहन सिंग यांना बदलून राहुल गांधींना पंतप्रधान करावं आणि लोकसभा निवडणुकीला सामोरं जावं अशी मागणी करणारा एक मोठा गट काँग्रेसमध्ये तयार झालाय.

10 जुलै रोजी कोलगेट प्रकरणी सुप्रीम कोर्टाने पंतप्रधानांनाच फटकारलं तर काँग्रेसची प्रचंड नाचक्की होईल आणि निवडणुकीत काँग्रेसला फटका बसेल असं काँग्रेसमधला हा गट मानतोय. त्यामुळे पावसाळी अधिवेशनापूर्वी मनमोहन सिंग यांना वगळून नव्या नेतृत्त्वाखाली निवडणुकीला सामोरं जावं, यासाठी हा गट प्रयत्नशील आहे.

पण सोनिया गांधींनी मात्र अजून कोणताच निर्णय घेतलेला नसल्याचं कळतंय. दरम्यान, सीएनएन आयबीएनने ही बातमी दाखवल्यावर काँग्रेसने ताबडतोब एक पत्रक काढून स्पष्टीकरण दिलंय. काँग्रेस पक्ष 2014ची निवडणूक पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्त्वाखीलच लढवेल, अशी माहिती पक्षाचे सरचिटणीस जर्नादन द्विवेदी यांनी दिली.

close