मालवाहतूकदार संपाचा मोठा फटका

January 8, 2009 8:30 AM0 commentsViews: 4

8 जानेवारीमालवाहतूकदारांच्या संपाचा आज चौथा दिवस आहे. या संपाचे परिणाम आता जाणवू लागले आहेत. राज्यात काही ठिकाणी मालाचा पुरवठा होऊ शकलेला नाही तर उपलब्ध साठाही संपत चालला आहे. एकट्या विदर्भात आठशे कोटी रूपयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. तर जळगावमध्ये लाखो रूपयांच्या केळीचंही नुकसान झालं आहे.माल वाहतूकदारांनी पुकारलेल्या संपाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. ट्रकचालकांच्या संपामुळे विदर्भातही दोन दिवसंात 800 कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झालेत. संप असाच सुरू राहिला तर फळभाज्यांच्या किंमती वाढतील, अशी शक्यता व्यापार्‍यांनी व्यक्त केलीय. गेल्या दोन दिवसांमध्ये मार्केटमधली आवक कमी झालीय. इथे रोज 100 ट्रक यायचे पण संपामुळे फक्त 25 ट्रक येतायत. त्यामुळे कांदा-बटाट्याचे भाव 4 ते 5 रुपयांनी वाढलेत. मुंबईत मात्र सध्या या संपाचा परिणामजाणवत नाहीये. मुंबईकरांना संपाची कोणतीही झळ पोहचू नये यासाठी मुंबईला एपीएमसी बाजार समितीनं संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतलाय. यामुळेच गेल्या तीन दिवसांमध्ये मुंबईला अन्नधान्य, भाजीपाला यांचा सुरळितपणे पुरवठा झाला आहे. मात्र या संपात सहभागी न झालेल्या काही ट्रकचालकांना संघटनेच्या रोषाला सामोरं जावं लागतंय. मुंबईत काल मुलुंड चेकनाका परीसरात चार वाहनांची तोडफोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या संपामध्ये प्रत्येक ट्रक मालक, ट्रक ड्रायव्हर यांनी सहभाग घेणं अत्यावश्यक असल्याचं सघटनेनं म्हटलंय. तर कोल्हापूरमध्येही अशाच प्रकारे वाहनांना लक्ष्य करण्यात आलं. आता हा संप लवकर मिटला नाही तर संपाची झळ सर्वसामान्यांना थेट बसायला सुरूवात होईल.

close