डॉक्टरकीला काळिमा, गर्भाशयांची करताय चोरी ?

May 14, 2013 9:52 AM0 commentsViews: 105

लातूर 14 मे : राजीव गांधी जीवनदायी विमा योजना लागू झाल्यापासून राज्यात गरीब महिलांना फसवून त्यांचं गर्भाशय काढण्याच्या अनेक घटना घडल्यात असा संशय 'तथापि' या आरोग्य क्षेत्रात काम करणार्‍या एनजीओनं केला. आंध्र प्रदेश, छत्तीसगड, बिहार या राज्यांत आधीच असे प्रकार उघड झालेत. महाराष्ट्रातल्या अशा घटनांचा तपास करावा अशी मागणी तथापिच्या विश्वस्त मेधा काळे यांनी केली आहे.

पैशांसाठी डॉक्टर या गरीब महिलांना फसवत असल्याचं काळे यांनी म्हटलंय. तथापिनं 2010 साली लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतल्या 9 गावांमधे 15 ते 50 वयोगटातल्या सुमारे 3200 महिलांचा सर्व्हे केला होता. त्यावेळी किरकोळ कारणांकरता गर्भाशय काढून टाकल्याचं त्यांना आढळून आलं.

महिलांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत त्यांचं गर्भाशय काढून टाकण्यासाठी त्यांच्याकडून हजारो रूपये उकळण्यात येतात. अनेक महिलांनी त्यासाठी दागिने विकून, कर्ज काढून पैसे जमा केले.

अनेक महिलांना शस्त्रक्रियेनंतर कंबरदुखी, सांधेदुखी हे त्रास सुरू झाले असंही या सर्वेतून पुढं आलंय. विशेष म्हणजे ज्या डॉक्टर्सनी शस्त्रक्रिया केल्यानंतर महिलांना डिसचार्ज कार्ड, रिपोर्टस्‌ही दिले नाहीत. एकूणच महाराष्ट्रातही पैशाकरता गर्भाशय काढून टाकण्याचे प्रकार वाढतायत अशी शंका मात्र निर्माण झालीय.

'तथापि'चा सर्व्हे

लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांमधील 9 गावांतल्या 15 वर्षांवरच्या 3279 महिलांचं सर्वेक्षण

90% महिला विवाहित5.4% महिला विधवा0.2% महिला घटस्फोटित1.3% महिला परित्यक्ता

गर्भाशय काढण्याची कारणं

50% महिला : अंगावरून खूप रक्त जाणं21.8% महिला : अंगावर पांढरं जाणं 6% महिला : गर्भाशयाचा कॅन्सर

close