बाबूगिरीची कमाल, चक्क इंडिका कारने खोदला खड्डा !

May 14, 2013 10:04 AM0 commentsViews: 49

चंद्रपूर 14 मे : रोजगार हमी योजनेत आजपर्यंत अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या जिवती तालुक्यात रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचाराचं एक चमत्कारीक प्रकरण समोर आलंय.शिरपूर पद्धतीनं बांधण्यात येणार्‍या बंधार्‍याच्या कामादरम्यान चक्क इंडिका कारनं या ठिकाणी तलाव खोदल्याचं दाखवण्यात आलं आहेत.

कामाच्या बिलामध्ये जेसीबी मशीन्सचे जे वाहन क्रमांक दाखवण्यात आले ते इंडिका आणि ट्रॅक्टरचे असल्याचं उघड झालंय. ही भ्रष्टाचाराची कथा रचणार्‍या चार अभियंत्यांना अटक करण्यात आलीय.धक्कादायक म्हणजे ज्या अधिकार्‍यानं हा भ्रष्टाचार उघडकीला आणलाय त्याला बक्षीस तर सोडाचं, त्याची चक्क बदली करण्यात आली आहेत.

close