‘मान्सून कमिंग सून’, 48 तासात अंदमान बेटावर हजेरी

May 14, 2013 11:05 AM0 commentsViews: 41

14 मे

एक आनंदाची बातमी…उन्हाचा तडाखा आता वाढला असला..तरी लवकरच त्यावर थंडगार शिडकावा होणार आहे. नैऋत्य मान्सूनचे वारे झपाट्याने अंदमान समुद्राच्या दिशेने येत आहेत. बंगालच्या उपसागरात वातावरण अनुकूल असल्यामुळे गुरुवारपर्यंत.. म्हणजे 48 तासांमध्ये अंदमान निकोबार बेटांवर पाऊस सुरू होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. उपसागरात आलेल्या चक्रीवादळामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस समाधानकारक होईल, असा अंदाज यापूर्वीच हवामान खात्याने वर्तवला आहे.

close