ज्येष्ठ विचारवंत असगर अली इंजिनियर यांचं निधन

May 14, 2013 11:31 AM0 commentsViews: 32

मुंबई 13 मे : ज्येष्ठ विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते असगर अली इंजिनियर यांचं आज मुंबईत निधन झालं. ते 74 वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना लिलावती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता. उद्या सकाळी सांताक्रुझ मधल्या दफनभूमीवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

असगर अली इंजिनियर हे इस्लाम धर्माचे ते गाढे अभ्यासक होते. जगभरात त्यांच्या विचारांची दखल घेतली जात असे. समाजातल्या अनिष्ट रूढी परंपरांवर त्यांनी आपल्या लिखानातून आणि भाषणांमधून जोरदार प्रहार केले होते. याबद्दल त्यांना प्रचंड टीकेलाही सामोरे जावे लागले पण या विरोधाला न जुमानता त्यांनी शेवटपर्यंत प्रबोधनाचा वसा सुरूच ठेवला होता. इस्लाम अँड मॉर्डन एज आणि सेक्युलर परस्पेक्टीव्ह ही दोन नियतकालिकं आणि इन्स्टिट्यूट ऑफ इस्लामिक स्टडिज ही संस्था त्यांनी स्थापन केली होती.

close