‘माझ्या जीवाला धोका’

May 14, 2013 4:03 PM0 commentsViews: 24

मुंबई 13 मे : आपल्या जीवाला मूलतत्त्ववाद्यांकडून धोका आहे, असा धक्कादायक दावा अभिनेता संजय दत्त याने केला आहे. टाडा कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत त्याने ही भीती व्यक्त केलीय. आणि म्हणून मुंबईतल्या टाडा कोर्टात शरण येण्याऐवजी पुण्यातल्या येरवडामध्ये शरण येण्याची परवानगी द्या अशी विनंती संजय दत्तनं केली आहे.

या नव्या याचिकेवर उद्या टाडा कोर्टात सुनावणी होणार आहे. येत्या 16 मे रोजी संजय दत्त कोर्टाला शरण जाणार आहे. 1993 साली झालेल्या बाँबस्फोटांच्या दरम्यान बेकायदेशीर पद्धतीने शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी संजयला दोषी ठरवण्यात आलंय. दरम्यान, पोलिसगिरी आणि वसुली या दोन सिनेमांसाठी संजयला मुदतावाढ मिळावी, ही याचिका ही आज सुप्रीम कोर्टाने फेटाळली.

close