तेल कंपन्यांच्या संपाचा विमानसेवेला फटका

January 8, 2009 5:47 AM0 commentsViews: 6

8 जानेवारी, मुंबईसरकारी तेल कर्मचार्‍यांच्या संपाचा फटका डोमेस्टिक विमानसेवेलाही बसला आहे. विमानवाहतुकीसाठी लागणारं इंधनच पुरेसं उपलब्ध होउ शकलं नाही, त्यामुऴ हवाई वाहतुकीवर चांगलाच परिणाम झालाय. अनेक प्रवाश्यांना याचा फटका तर बसलाच, तर नारायण राणे, बाळासाहेब विखे पाटील, भाजपाचे विनोद तावडे नेतेही विमानतळावर दीड ते दोन तास अडकून पडले होते. वाहतूकदारांच्या संपाबरोबरच तेल कर्मचारीही संपावर गेल्याने, आता मुंबईकरांना टंचाईला सामोरं जाव लागण्याची शक्यता आहे.

close