दोन विद्यमान आमदार आमच्या संपर्कात -मुंडे

May 14, 2013 4:38 PM0 commentsViews: 38

मुंबई 14 मे : दोन विद्यमान आमदार भाजपच्या संपर्कात आहेत असा खळबळजनक दावा भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला. भाजपची मुंबईत पत्रकार परिषद झाली. त्यावेळी शिरूरचे माजी आमदार बाबूराव पाचरणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना मुंडेंनी आणखी 7 ते 8 लोक प्रवेशासाठी आपल्या संपर्कात असल्याचं सांगितलं. विरोधकांना जशास तसे उत्तर देणार आहे आणि त्याची सुरुवात पुण्यातून केल्याचं सांगत 2 विद्यमान आमदार संपर्कात असल्याचं मुंडे यांनी सांगितलं. पण हे दोन आमदार कोण आहे आणि कोणत्या पक्षाचे आहे यांचं उत्तर मात्र मुंडेंनी टाळलं. तसंच मुंबईत रेसकोर्सच्या जागेवर थीम पार्क व्हावं अशी भाजपचीही मागणी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

close