बंगलोरला धक्का,पंजाबचा ‘रॉयल’ विजय

May 14, 2013 5:19 PM0 commentsViews: 31

14 मे

पंजाब किंग्ज एलेव्हननं बंगलोर रॉयल चॅलेंजर्सला रॉयल दणका दिला. पंजाबने बंगलोरचा 7 विकेटने दणदणीत पराभव करत त्यांच्या प्लेऑफच्या स्वप्नालाही धक्का दिला.

पहिली बॅटिंग करणार्‍या बंगलोरनं पंजाबसमोर 175 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. सुरुवातीला पंजाबच्या बॉलर्सने टिच्चून बॉलिंग करत गेल आणि कोहलीच्या फटकेबाजीला आळा घातला खरा पण विकेट काढण्यात ते अपयशी ठरले. पण त्यानंतर गेलच्या फटकेबाजीची शिकार पंजाबचे बॉलर्स बनलेच… गेलनं 4 सिक्स ठोकत आपली हाफ सेंच्युरी पूर्ण केली.

त्यानंतर गेल आणि कोहलीचा धडाका सुरु झाला. गेलनं 77 तर कोहलीनं 57 रन्स केले. पंजाबतर्फे परविंदर अवानानं 3 तर अझर मेहमूदनं 2 विकेट घेतल्या. पंजाबनं आपल्या इनिंगची सुरुवात सावध केली. शॉन मार्श 8 रन्सवर आऊट झाला. पण त्यानंतर ऍडम गिलख्रिस्ट आणि अझर मेहमूदनं तुफान फटकेबाजी केली.

गिलख्रिस्टच्या धुवाँधार बॅटिंगसमोर आज बंगलोरचे बॉलर्स निष्प्रभ ठरले. गिलख्रिस्टनं 85 तर अझर मेहमूदनं 61 रन्स ठोकले. आणि याच कामगिरीच्या जोरावर पंजाबनं बंगलोरला धूळ चारली.

close