सिब्बलांनी दोन हजार कोटींची केली लाचखोरी ? -केजरीवाल

May 15, 2013 9:47 AM0 commentsViews: 286

नवी दिल्ली 15 मे : आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आता दूरसंचार मंत्री कपील सिब्बल यांना टार्गेट केलंय. दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी व्होडाफोन-एस्सार डीलमध्ये सिब्बल यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला. दोन हजार कोटींच्या या डीलचा वाद कोर्टाबाहेर सोडवण्यासाठी सिब्बल यांनी आग्रह का धरला असा प्रश्न केजरीवाल यांनी विचारला.कपील सिब्बल यांचा मुलगा अमित सिब्बल व्होडाफोननं खरेदी केलेल्या हचिन्सन या कंपनीचे वकील होते. त्यामुळे संशयाला जागा असल्याचं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. पण अमित सिब्बल हे 2007 ते 2009 या दरम्यान, हचिन्सनचे वकील होते. आणि डीलचा वाद हा 2012 मध्ये निर्माण झाल्याचं सरकारी सूत्रांनी म्हटलंय. कपील सिब्बल दूरसंचार मंत्री झाल्यानंतर सिब्बल यांच्या मुलानं कोणत्याही दूरसंचार कंपनीचं वकीलपत्र घेतलं नाही, असंही सूत्रांचं म्हणणं आहे. व्होडाफोनच्या टॅक्सचा प्रश्न पुढच्या आठवड्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी येण्याची शक्यता आहे.

close