इंधना अभावी मुंबई कोलमडणार

January 8, 2009 11:28 AM0 commentsViews:

8 जानेवारी, मुंबईएकीकडे वाहतूकदारांचा संप सुरू असताना आता वेतनवाढीच्या मागणीसाठी सरकारी तेल कंपन्यांचे 50 हजारांहून जास्त कर्मचारी मंगळवारपासून संपावर गेले आहेत. या संपामुळे अनेक मोठ्या कारखान्यांना मिळणारा नॅचरल गॅसचा पुरवठा सध्या थांबवण्यात आला आहे. संप 48 तास सुरू राहिला तर इंधनाअभावी मुंबई कोलमडेल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.या संपात हिंदुस्तान पेट्रोलियम वगळता इतर सर्व सरकारी तेल कंपन्या सामील झाल्या आहेत. तेल कंपन्यांच्या कर्मचार्‍यांच्या संपाचा परिमाण पेट्रोलपंपांना होणार्‍या इंधन पुरवठयावर होतोय. पंपावरचा इंधनसाठा हळूहळू कमी व्हायला लागला आहे. ओएनजीसीच्या मुंबई हायवरुन गॅसचा पुरवठा खंडीत झालाय. त्यामुळे हजीरा-विजयपूर-जगदिशपूर पाईपलाईन बंद झाली आहे.एकूणच या संपाचा मोठा परिणाम ओएनजीसीवर झालेला दिसतोय. ओनजीसीमधल्या 11 तर आयओसी आणि गेल मधल्या प्रत्येकी तीन अधिकार्‍यांना या संपात सहभागी झाल्याबद्दल निलंबित करण्यात आलंय. ओनजीसीच्या दोन युनियन मेंबर्सनाही अटक करण्यात आली आहे. दरम्यान मुंबई विमानतळावर रिफिलिंग करण्यासाठी आयओसीनं लष्कराला पाचारण करण्यात आलंय.

close