संजूबाबा उद्या कोर्टात येणार शरण

May 15, 2013 9:57 AM0 commentsViews: 6

मुंबई 15 मे : अभिनेता संजय दत्तने येरवडा जेलमध्ये शरण येण्याची याचिका मागे घेतली आहे. त्यामुळे कोर्टाने ही याचिका रद्दबातल ठरवली आहे. आता संजय उद्या टाडा कोर्टातच शरण येणार हे स्पष्ट झालंय.1993 साली झालेल्या बाँबस्फोट प्रकरणी बेकायदेशीर पद्धतीने शस्त्रास्त्र बाळगल्याच्या प्रकरणी संजयला दोषी ठरवण्यात आलंय. सुप्रीम कोर्टाने शरण येण्यासाठी मुदतवाढीची याचिका आधीच फेटाळली आहे. संजय दत्तकडे कुठलाही पर्याय नसल्याने त्याला कारागृहात जावच लागेल असं विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी म्हटलंय. पण जेलमध्ये गेल्यानंतरही संजय दत्त बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करेल, अशी भीती स्फोटातल्या पीडितांनी व्यक्त केली आहे.

close