भावाने केली भावाची हत्या

May 15, 2013 10:22 AM0 commentsViews: 78

मुंबई 15 मे : आदित्य रांका हत्या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्याविषयी पत्रकार परिषद घेऊन अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी माहिती दिली आहे. हिमांशु रांका आणि ब्रिजेश संघवी अशी या आरोपींची नावं आहेत. धक्कादायक म्हणजे हिमांशु रांका हा आदित्यचा चुलत भाऊ आहे. या दोन्ही आरोपींनी 13 वर्षाचा आदित्य रांकाची हत्या केल्याची कबुली दिली आहे.

त्यांना दुपारी गिरगाव कोर्टात हजर करण्यात येणार आहे. तीस लाखाच्या खंडणीकरता डायमंड ब्रोकर जितेंद्र रांका यांचा मुलगा आदित्यचं अपहरण करण्यात आलं होतं. आदित्यच्या सुटकेसाठी 30 लाखांची खंडणी मागण्यात आली होती.

त्यानंतर आरोपींनी अपहरण करुन रायगडमधील पाली इथल्या आंबा नदीवर नेऊन आदित्याची हत्या केली. आणि त्याचा मृतदेह मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर फेकून देण्यात आला. या प्रकरणी आरोपींवर व्ही.पी.रोड पोलीस चौकीत अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

close