लाचखोर जगदीश वाघच्या लॉकर्समध्ये सापडली 1 कोटींची रोकड

May 15, 2013 10:29 AM0 commentsViews: 11

नाशिक 15 मे : लाचखोर अभियंता जगदीश वाघ यांच्या सगळ्या लॉकर्समधून मंगळवारी 1 कोटी 13 लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या तपासात त्यांच्याकडून एकूण 2 कोटी 22 लाख रूपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. त्याशिवाय चिखलीकर यांच्या घरातून 5 लाखाची रोकड मिळाली.

आतापर्यंतची चिखलीकरांची मालमत्ता 17 कोटी 60 लाख 90 हजार रूपयांची झाली. तब्येतीच्या कारणावरून हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर काल चिखलीकर आणि वाघ या दोघांच्याही घरी तपासाला सुरूवात झाली होती.

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचे विशेष कार्य अधिकारी संदीप बेडसे यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे. याचा संबंध नाशिकमधील लाचखोर अधिकारी चिखलीकर आणि वाघ यांच्याशी असल्याची चर्चा आहे. या प्रकरणी बेडसे यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलीय.

close