टोलविरोधात कोल्हापूरकर पुन्हा आंदोलनाच्या तयारीत

May 15, 2013 10:35 AM0 commentsViews: 8

कोल्हापूर 15 मे : इथं टोलविरोधात पुन्हा एकदा आंदोलन पेटण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरात सध्या तणावाचं वातावरण आहे. आयआरबी कंपनीने 220 कोटी रुपयांचा रस्ते विकास प्रकल्प राबवला मात्र त्या मोबदल्यात 30 वर्षं टोल द्यावा लागणार आहे. मात्र रस्त्यांचं काम निकृष्ट असल्यानं कोल्हापूरकरांनी टोलला विरोध केला. त्यातच टोलवरची स्थगिती मुख्यमंत्र्यांनी उठवली. आज सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन टोल न देण्याचा पुनरुच्चार केला. तसेच कोणत्या अटींवर स्थगिती उठवली याचं स्पष्टीकरण सरकारने द्यावं अशी मागणीही करण्यात आलीय. या बैठकीला 3 आमदार तसेच शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी. पाटील उपस्थित होते.

close