बंद साखर कारखान्यांचा लिलाव

January 8, 2009 11:25 AM0 commentsViews: 1

8 जानेवारी पुणेनितीन चौधरीराज्यात 29 साखर कारखाने बंद आहेत. लवकरच त्यांचा लिलाव करण्यात येणार आहे. हे साखर कारखाने वेगवेगळया कारणांनी अनेक वर्षांपासून बंद होते.राज्य सरकार, बँकाआणि भागधारकांच गुंतलेलं भांडवल सोडविण्यासाठी ह्या साखर कारखन्याच्या लिलावाचा निर्णय घेण्यात आल्याचं राज्याचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी म्हंटलयं. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.ऊस गाळपाची क्षमता असूनही तसंच साखर आयुक्तालयाकडून प्रयत्न करूनही हे कारखाने सुरू होऊ शकत नव्हते. त्यामुळे या कारखान्यांबाबत नेमलेल्या एका समितीनं हे कारखाने बंद करण्याची शिफारस केली. याबाबतची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.या कारखान्यांच्या विक्रीसाठी साखर आयुक्तालय लवकरच टेंडर काढणार आहे.कारखाने विकत घेण्यासाठी सहकारी कारखान्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. त्यानंतर खासगी कारखान्यांचा विचार करण्यात येईल. ठराविक किंमत मिळाली नाही तर हे कारखाने भाडेतत्त्वावर देण्यात येतील.

close