आडमुठ्या व्यापार्‍यांचं उद्यापासून जेलभरो आंदोलन

May 15, 2013 3:13 PM0 commentsViews: 8

मुंबई 15 मे : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आडमुठ्या व्यापार्‍यांनी बंद कायम ठेवला आहे. आता हा वाद आणखी चिघळत चालला आहे. व्यापारी उद्यापासून राज्यभरात जेलभरो आंदोलन करणार आहेत. एलबीटी प्रकरण व्यापार्‍यांची मुख्य सचिवांसोबत आजची चर्चा पुन्हा एकदा फिसकटली. त्यामुळे व्यापारी संघटना आंदोलनावर ठाम आहेत. एलबीटी प्रकरणी सरकारला तोडगा काढायचाच नाही, सरकार असंवेदनशील, अशी टीका व्यापारी संघटनेनं केली आहे. तर दुसरीकडे राज्यभरातील व्यापार्‍यांनी दुकानं सुरू केली असल्यामुळे आंदोलनात फूट पडलीय. तरी सुद्धा व्यापार्‍यांनी बंदची भूमिका कायम ठेवली आहे.

close