गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांसाठी बाराशे कोटींचे पॅकेज जाहीर

May 15, 2013 3:29 PM0 commentsViews: 15

नागपूर 15 मे : विदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसीखुर्द प्रकल्पाच्या प्रकल्पग्रस्तांसाठी बाराशे कोटी रुपयांचे पॅकेज देण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केली. मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी गोसीखुर्द प्रकल्पाला भेट दिली. यासंबंधीचा निर्णय लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाईल असं त्यांनी सांगितलं. प्रकल्पग्रस्तांना मदतीचं वाटप करण्यासाठी स्वतंत्र कार्यालय, मासेमारी करण्यासाठी प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना प्राधान्य, देणार अशा घोषणा त्यांनी केल्या. विशेष म्हणजे तब्बल पंचवीस वर्षानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी गोसीखुर्दला भेट दिलीय.

close