रेसकोर्सबाबत निर्णय राज्य सरकारच घेणार -थोरात

May 15, 2013 4:19 PM0 commentsViews: 16

15 मे

महालक्ष्मी रेसकोर्सची जागा राज्य सरकारची आहे आणि त्याबाबतचा निर्णय सरकारच घेणार असं राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांनी स्पष्ट केलंय. राज्य सरकारने ही जागा महापालिकेला भाड्याने दिलीय आणि ती जागा वेगळ्या कारणासाठी वापरायची असेल तर महापालिकेला सरकारकडे प्रस्ताव पाठवावा लागेल अशी सुचनाही थोरात यांनी दिली.

दरम्यान, रेसकोर्स नवी मुंबईत हलवा अशी सूचना आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी केली आहे. मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सचा वाद सध्या चांगलाच पेटलाय. रेसकोर्सची जागा रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबकडून परत घेण्याचा निर्णय मुंबई महापालिकेच्या गटनेत्यांनी घेतला. रेसकोर्सच्या जागेवर थीम पार्क, उद्यानं, बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारण्याच्या चर्चांना सध्या ऊत आला आहे. त्याबाबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांनी स्पष्टीकरण देत चर्चेत सरकारची भूमिका स्पष्ट केलीय.

close