सीईओंना काळं फासण्याचा प्रयत्न

January 8, 2009 8:27 AM0 commentsViews: 1

8 जानेवारी, गडचिरोलीसतीश त्रिनगरीवार गडचिरोली जिल्ह्यांतील शाळातील दुरावस्थेबाबत जनआंदोलन समितीचे कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेच्या सीईओ आनंद भरकडे यांची भेट घेतली. त्यावेळी सीईओंना दिलेल्या निवेदनात 496 शिक्षकांच्या जागा रिक्त असून 50 शाळांची स्थिती अत्यंत वाईट असून त्या बंद आहेत असं आंदोलकांनी स्पष्ट केलं. पण जिल्हा परिषदेच्या सीईओंनी त्याचं म्हणणं ऐकून न घेता. तुमची माहिती चुकीची आहे. तसंच आम्ही याबाबतची पूर्ण चौकशी करू असं उत्तर दिलं. त्यामुळे समितीचे कार्यकर्ते आणि सीईओं याच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. दरम्यान तेथे असलेल्या एका कार्यकर्त्याने सीईओंवर वंगण फासण्याचा प्रयत्न केला.मात्र सीईओंनीच त्या कार्यकर्त्याला धक्काबुक्की करून बाहेर काढलं. आणि नंतर जिल्हा परिषदेच्या कर्मचा-यांनी त्याला चोप दिला. जिल्हा परिषदेच्या सीईओंनी जनआंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांची तक्रार व्यवस्थित ऐकून घेतली असती तर असा प्रकार घडला नसता असं बोललं जातं.

close