‘श्रीसंतला धोणी आणि हरभजनने अडकवलं’

May 16, 2013 1:28 PM0 commentsViews: 63

16 मे : स्पॉट फिक्सिंग प्रकरणात श्रीसंतला गोवण्यात आलं आहे. या मागे भारतीय टीमचा कर्णधार महेंद्रसिंग धोणी आणि हरभजन सिंगचा हात आहे असा खळबळजनक आरोप श्रीसंतच्या वडिलांनी केला आहे. 'मल्याळम मनोरमा'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा आरोप केला. श्रीसंतनं हरभजनविरोधात ट्विटरवर मत व्यक्त केलं होतं. तेच त्याला भोवलं. तसंच श्रीसंत धोणीच्या जवळ आहे, आणि त्याच्या अनेक वैयक्तिक गोष्टी त्याला माहिती आहेत. त्यामुळेच श्रीसंतला या प्रकरणात गोवण्यात आलंय, असा आरोप श्रीसंतच्या वडिलांना केला आहे. तसंच श्रीसंतला टीममध्ये घेणार नाही अशी धमकीही धोणीने दिली होती असंही त्यांनी म्हटलं. मात्र श्रीसंतच्या आईने धोणी आणि हरभजन असं काही करू शकत नाही असा दावा केला आहे.

close