राज्यात इंधनाची टंचाई

January 8, 2009 10:03 AM0 commentsViews: 1

8 जानेवारीतेल कंपन्यांच्या संपामुळे राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल, डिझेलची टंचाई जाणवत आहे. नाशिक,कोल्हापूर आणि नागपूरमध्येही या संपाचा परिणाम दिसायला लागला आहे. पुण्यात 2 दिवस पुरेल एवढाच पेट्रोलचा साठा आहे. तर सोलापूरमध्ये एक दिवस,जळगावमध्ये 2 दिवस आणि औरंगाबादमध्ये एकच दिवस पुरेल एवढाचं पेट्रोलचा साठा आहे. संपाचा फटका वीज उत्पादनालाही बसला आहे. त्यामुळे राज्यातलं लोडशेडिंग आता आणखी एक ते दीड तासाने वाढणार आहे. राज्यातलं वीज उत्पादन 1000 मेगावॅटने कमी होणार आहे. हे लोडशेडिंग संध्याकाळच्या वेळी केलं जाईल.

close