आदिवासींचा पोषण आहार फेकला कचर्‍यात

May 17, 2013 8:00 AM0 commentsViews: 28

17 मे : मुरबाड इथं पोषण आहार फेकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. बालविकास प्रकल्पाअंतर्गत हा आहार गरोदर महिला आणि अंगावर दूध पिणार्‍या बाळांच्या मातांसाठी देण्यात येणार होता. पण प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा आहार महिलांपर्यंत पोहचू शकला नाही. जिल्हापरिषदेच्या दोन वर्षापासून बंद असलेल्या शाळेच्या वर्गात हा आहार फेकण्यात आला. याविषयी अधिकार्‍यांशी संवाद साधला असतात कोणीही अधिकारी उत्तर देऊ शकलं नाही. आदिवासी भागात गरोदर मातांच्या नवजात अर्भक मृत्यू दर मोठा असताना पोषण आहार असा फेकण्यात येत असल्याबद्दल संताप व्यक्त होतोय. यावर अधिकार्‍यांकडून स्पष्टीकरण मागितलं असता त्यांनी अत्यंत संतापजनक अशी प्रतिक्रिया दिली.

close